सोलापूर – गांधीनगर अक्कलकोट रोड येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळातर्फे महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश कोठे उपस्थित होते. यावेळी महेश कोठे यांचा सत्कार मंडळाचे संस्थापक लक्ष्मीनारायण दासरी व ज्योतिताई दासरी यांच्या हस्ते करण्यात आला. मंडळाच्या या उत्सवाचे महेश अण्णा कोठे यांनी विशेष कौतुक करत सर्वांनां शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमांस परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. महापूजेनंतर महेश कोठे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे 3000 नागरिक आणि भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उत्सव अध्यक्ष सतीश दासरी, पवन आडकी, सदानंद दासरी, रोहित दासरी, रामप्रसाद दासरी, संतोष दासरी, संतोष माटेटी, सागर माटेटी, प्रसाद मादास, गोपाळ गाजूल, बोलाबत्तीन, शशिकांत पुलगम सह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरज दासरी यांनी केले.