• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

इलेक्ट्रो २०२३ प्रदर्शनाचे थाटात उदघाटन

by Yes News Marathi
January 24, 2023
in मुख्य बातमी
0
इलेक्ट्रो २०२३ प्रदर्शनाचे थाटात उदघाटन
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन व होम ॲप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘‘इलेक्ट्रो २०२३’’ चे आयोजन केले गेले आहे. दि. २४ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेद्वारा स्मार्ट सिटी अंतर्गत इंद्रधनु जवळील  विष्णू मिल कंपाऊन्डमध्ये निर्मित एक्झिबिशन ग्राऊंडवर आयोजित प्रर्शनाचे उदघाटन एस. विजय , असि. जनरल मॅनेजर, मेटझ्‌ इंडिया प्रा. लि. यांच्या शुभहस्ते व  संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त, सोमपा यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मंचावर से चे अध्यक्ष ईश्वर मालू, उपाध्यक्ष सूरजरतन धुत, सचिव आनंद येमुल, सह सचिव  सुर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भुषण  भूतडा व इलेकट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण उपस्थित होते. यंदा इलक्ट्रो प्रदर्शनाचे मेटझ्‌ हे मुख्य प्रायोजक असून केल्व्हीनेटर,सिस्का एलईडी, बीपीएल हे सह प्रायोजक आहेत. बजाज फायनान्स हे फायनान्स असोसिएट आहेत.

एस. विजय यांनी या उपक्रमाचे कौतुक  करीत आयोजनकांचे अभिनंदन केले. अश्या प्रकारचे प्रदर्शन एकाधी  संघटना भरविते हे खरेच वाखण्यायोग्य असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला . संदीप कारंजे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत हे मैदान निर्मित केले गेले असून सोलापूरकरांना हे स्थळ नक्कीच आवडेल याचा विश्वास व्यक्त केला

प्रारंभी प्रास्ताविक  करताना अध्यक्ष ईश्वर मालू यांनी  इलेक्ट्रो २०२३ या प्रदर्शनाचे हे २३ वे वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या  आसपासचे सर्व ग्राहकांसाठी ही एक पर्वणीच असते असे नमूद केले. दररोज दु. ४ ते रा. ९.३० व रविवारी स.११ ते रा. ९.३० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टिव्ही, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड,टेलीफोन, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर, स्टॅबीलायझर,चिमणी हुड, कॉम्प्युटर, फिटनेस इक्विपमेंटस्‌ इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात  विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच  बजाज फायनान्स व इतरफायनान्स च्या माध्यमातून शुन्य टक्के ० % व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते. सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्याेजन करण्यात येतात.

 
इलेकट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण आपल्या भाषणात बोलताना बोलले कि सेडा तर्फे आयोजित इलेक्ट्रो २०२३ ला   यावर्षी आयोजक, सहभागी व ग्राहकांममध्ये प्रचंड उत्साह आहे. सुमारे ३५० स्टॉल्स्‌ असल्याचे नमूद करीत सुमारे एक लाख पेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला. . प्रदर्शनाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे सुमारे ३०% स्टॉल्स्‌ हे विशेषरित्या निर्मित वातानुकुलीत दालनात आहेत  . या प्रदर्शनामध्ये ठिकठिकाणी ग्राहकांना बसण्याची सोय. तसेच शुध्द पिण्याचे पाण्याची सोय करण्यात आलेली  आहे. भेट देणाऱ्या ग्राहकांना दररोज लकी व शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहे. यंदाचे प्रदर्शन हे वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि सुविधा असणार आहे.  खवय्या साठी फुड कोर्ट इ. सोयी असणार आहेत.धुळमुक्त प्रदर्शनासाठी संपूर्ण मैदान वर मॅटींग ची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तिंना देखील प्रदर्शन अनुभवता येणार असुन त्यांच्यासाठी व्हील चेअरची विशेष सोय करण्यात आली आहे. प्रेक्षक आणि स्टॉल धारक यांच्या सुरक्षिततेसाठी फायर ब्रिगेड तसेच सिक्युरिटी गार्डस हि नेमण्यात आले आहेत.सेडा तर्फे प्रदर्शन दरम्यान दररोज रक्तदान उपक्रम घेतला जाणार आहे.संपूर्ण प्रदर्शन जास्तीत जास्त कसे डिजीटल होईल यावर संपूर्ण कटाक्ष आहे.प्रर्दशनासाठी मोफत पार्कींगची सोय व माहितीसाठी वेगळे काऊंटर ची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले

याप्रसंगी इलेकट्रो २०२३ निमित्त काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी रिलायन्स डिजिटल चे पश्चिम विभाग प्रमुख के आर. सिंग, सिस्का एलईडी चे वितरक गिरीश मुंदडा  , तसेच आर्किटेक्ट गोकुळ  चितारी , कोंत्रॅक्टर किरण मोरे, शशिकांत हत्ती यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाठक  यांनी केले. सचिव आनंद येमुल,यांनी स्वागत केले तर सह सचिव सूर्यकांत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन यांनी केले.  कार्यक्रमास संचालक सर्वश्री  सुयोग कालाणी , गिरीष मुंदडा, विजय टेके,  हरीष कुकरेजा, संदेश कोठारी व सुनिल भांजे ,रवींद्र पाचलाग, गणेश सुत्रावे,रमेश खूने, इर्शाद शेख, याल्लापा भोसले, सचिन करवा, चंद्रकांत शाहपुरे, दत्तात्रय अंबुरे, शिरीष कोठावळे तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह, सतिश मालू,  जितेंद्र राठी, विपीन कुलकर्णी , कौशिक शाह , खुशाल देढीया, आनंदराज दोशी  सह उद्योगपती राजकुमार राठी , विश्वजित कुलकर्णी, राजेश जाजू, शंतनू बदामीकर, हरीश कुकरेजा, जॉय छाब्रिया , मंगेश कस्तुरे, स्टॉल धारक, विविध कंपनीचे अधिकारी वर्ग, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्तीत होते. 

Previous Post

अखर्चित निघी राहिलेस तांत्रिक अधिकारी यांचेवर कारवाई – सिईओ दिलीप स्वामी

Next Post

भारताचा किवींना व्हाईट वॉश

Next Post
भारताचा किवींना व्हाईट वॉश

भारताचा किवींना व्हाईट वॉश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group