No Result
View All Result
- सोलापूर – आज दि. 20.01.2022 रोजी, रोजगार मेळावा -2023 मोहिमे अंतर्गत पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे 71 हजार युवकांना नियुक्ती पत्र प्रदान केले. या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये एकुण 10 लाख नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान ‘रोजगार मेळा’ सुरू केला गेला आहे. या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ आज 20.01.2023 रोजी पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर सोलापुर रेल्वे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार यांच्या हस्ते 42 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. उमेदवारांना संबोधित करताना परिहार यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करताना रेल्वेसाठी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. यावेळी प्रदिप हिरडे, वरिष्ठ परिचालन प्रबंधक यांनी रेल्वेच्या संरक्षेविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी वरिष्ठ विभागीय कर्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ परिचालन प्रबंधक प्रदिप हिरडे, सहाय्यक कार्मिक अधिकारी सुधिर खोत आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरीक्षक अक्षय गर्दने, जनसंपर्क निरीक्षक यश जनबंधु तथा अन्य कर्मचारी गण, ब्रम्हय्या, नागेश नवले, संजीव कुमार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी, सुधिर खोत यांनी केले.
No Result
View All Result