सोलापूर – नवीन वर्षासाठी आपण नवनवीन संकल्प करतो हे संकल्पच आपल्याला विकासाकडे नेतात. शाश्वत विकासाचा संकल्प जिल्ह्यात सुरु आहे. यासाठी 17 ध्येय आणि 9 थीम (संकल्पना) यावर काम सुरु आहे. या शाश्वत विकासानुसार गावे स्वावलंबी होऊन समृध्द करा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले.
- जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांचे साठी व्हीसी चे आयोजन करणेत आले होते. सर्वाना उप मुखय कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी सविस्तर सुचना दिले. गावानं गावासाठी शाश्वत विकासाची ध्येय साध्य केली तर भविष्यातील मानवजातीच्या सर्वांगीण विकसाचा पाया भक्कम होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने नियोजनबध्द कार्यक्रम आखला आहे. यात देशाने 17 ध्येय साध्य करण्यासाठी 9 थीम तयार केल्या आहेत. याद्वारे गावातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला डोळयासमोर ठेवून राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या टप्यावर विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत. आता तर ही ध्येय साध्य करण्यासाठी 15 वा वित्त आयोगाचा निधी वापरता येणार आहे. यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचे राज्य संचालक आनंद भंडारी, बाळासाहेब जगताप , यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकासाची ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक थीमसाठी व प्रत्येक जिल्हयात एका थीमसाठी 5 प्रवीण प्रशिक्षक अशाप्रकारे जिल्हानिहाय 45 प्रवीण प्रशिक्षक तयार केले आहेत. सर्वांच्या सहकार्यातून 2030 पर्यंत ही ध्येय साध्य करण्याचा अवघड टप्पा सहज साध्य होणार, असा विश्वास प्रवीण प्रशिक्षक व्यक्त करत आहेत.सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात 45 प्रवीण प्रशिक्षक टीम तयार आहे. सर्वाना यशदा स्तरवर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
- लिंग समभाव पोषक गांव लिंगसमभाव स्थापन करण्यासाठी महिलांना समान संधी उपलब्ध करुन देणे. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि मुलींना सुरक्षित वातावरण देणे. गरीबमुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृध्दीस पोषक गाव समाज घटकांची भरभराट आणि वाढ होण्यासाठी आवश्यक उपजीविका विकासची पुरेशी साधने असतील. आरोग्यदायी गाव या गावात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचे आरोग्य, खुशालीची खात्री बालस्नेही गावं मुलांना निर्धोक आणि सुरक्षित वातावरण तसेच चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा देणे. जलसमृध्द गांव : गावातील सर्व घरांसाठी वैयक्तिक नळजोडद्वारे गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा. उत्तम पाणी व्यवस्थापन,शेती आणि पाण्याच्या गरजा पूर्ण होतील. इतकी पाण्याची उपलब्धता • स्वच्छ आणि हरित गाव :- बालकांच्या भविष्यासाठी बालस्नेही, निसर्गसंपन्न हरित गाव निर्माण करणे, पारंपारिक ऊर्जेचा वापर, स्वच्छता, पर्यावरणाशी अनुकूल व्यवहार आणि पर्यावरण रक्षणकरणे , पायाभूत सुविधायुक्त गाव गावातील सर्वांना परवडणारी घरे, निर्धोक आणि पुरेशा प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे.सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव- गावातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते याची भावना ग्रामस्थांत निर्माण करणे. नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देणे. सुशासनयुक्त गाव: गावातील सर्व लोकांना विविध विकास योजनांचा लाभ व जबाबदार सेवा वितरणाची हमी देणे. या विविघ बाबींचा या मध्ये समावेश आसल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.