येस न्युज मराठी नेटवर्क : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रथमिक शाळा बीबीदारफळ नंबर एक इयत्ता चौथी मधील तीन विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्या तीनही विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली होती.
दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी सोरेगाव येथे तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये अतिशय अटीतटीचा सामना झाला. सर्वच शाळांनी खूपच तयारीनिशी आपले विद्यार्थी उपस्थित केले होते. एकूण १०० शाळांमध्ये पुन्हा एकदा आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकाच वर्गातील तीनही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गावाचे व शाळेचे नाव उज्वल केले आहे. या तीनही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
तालुक्याच्या इतिहासात एकाच शाळेतील आणि तेही एकाच वर्गातील तीन विद्यार्थ्यांची तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी बाजी मारण्याची संधी जिल्हा परिषद शाळा बीबीदारफळ नंबर १ ने मिळवली आहे .
♦️वक्तृत्व स्पर्धा♦️
*श्लोक शाहू लामकाने प्रथम क्रमांक इयत्ता चौथी अ
बक्षीस १०००/
♦️निबंध स्पर्धा♦️
कुमारी चाहत मोहम्मद इनामदार प्रथम क्रमांक
*इयत्ता चौथी अ
बक्षीस १०००/
♦️कथाकथन स्पर्धा♦️
कुमारी प्रियांका रामेश्वर चौरे इयत्ता चौथी अ प्रथम क्रमांक
बक्षीस १०००/
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि वर्गशिक्षिका तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती शीला नन्नवरे मॅडम यांचे गट शिक्षणाधिकारी श्री बापूराव जमादार सर, श्री विठ्ठलसिंग राजपूत सर (केंद्रप्रमुख बाळे केंद्र) श्री परमेश्वर जमादार सर(केंद्रप्रमुख नान्नज केंद्र) श्री सिद्राम वाघमोडे (केंद्रप्रमुख कुमठे केंद्र) श्री स्वामी सर (केंद्रप्रमुख देगाव केंद्र), पाटील सर, सोरेगाव शाळेचे मुख्याध्यापक, स्पर्धांसाठी लाभलेले सर्व परीक्षक, जी.प.शाळा बीबीदारफळ न १ शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी मॅडम व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.