सोलापूर – सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंग व शहरातील अष्टविनायक मंदिर हे सोलापूर शहरातील प्रमुख श्रद्धास्थान असून सालाबादप्रमाणे मकर संक्रांत या दिवशी श्री सिद्धरामेश्वर यात्रा भरत असते. या यात्रा सोहळ्यामध्ये 68 लिंग तैल अभिषेक, नंदीध्वज प्रदक्षिणा पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होत असतात. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंगांपैकी बुधवार पेठ परिसरातील श्री अनंत रामेश्वर लिंग, जोगेश्वर लिंग, पाशुपती लिंग, शतकेश्वर लिंग, श्री यल्लेश्वर लिंग यांचा समावेश असून यातील श्री सिद्धरामेश्वर स्थापित 5 विरकर गणपती व 31 वे लिंग श्री पशुपती देशमुख, मळा हॉस्पिटल मागे, आयुर्वेद कॉलेज शेजारी येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून व विशेष प्रयत्नातून साकारण्यात आले असून यामध्ये ग्रॅनाईट बसवणे, मंदिर सर्व परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, स्टेनलेस स्टील बसवणे, रेलिंग बसविणे, एसीपी शीट बसविणे, सभामंडप पीओपी करणे इत्यादी कामे जीर्णोद्धार अंतर्गत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादि, सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व बसवराज शास्त्री यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सुधाताई अळीमोरे यांचा सत्कार कविताताई चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला.
चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी व महेश थोबडे व राजू देशमुख आणि सुरेश जैन यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला. सुधाकर इंगळे महाराज यांचा सत्कार पी.बी. ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे यांच्या हस्ते करण्यात आला. अनिल छाजेड यांचा सत्कार पीबी ग्रुप अध्यक्ष संदीप कापुरे यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जीर्णोद्धार व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभेचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सोलापूर काँग्रेस पक्षाचे शहर कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश पुजारी, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सुधाकर इंगळे महाराज, पतंजलीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुधाताई आळीमोरे, बसवराज शास्त्री, विधी तज्ञ विजय मराठे, उद्योगपती हर्षल कोठारी, जयचंद, सुभाष पाटील, अनिल छाजेड, सुदेश देशमुख, राजू देशमुख, विभागीय अधिकारी चौबे साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी, महेश निलंगे, स्वामी प्रभूराज, मल्लिनाथ निलंगे, शिवयोगी शास्त्री, नंदकिशोर धूत, जैन गुरुकुल दिगंबर हायस्कूलचे प्राचार्य शहा सर, नितीन बंदपट्टे ई. मान्यवरांच्या उपस्थितीत श्री वीरकर गणपती देशमुख मळा येथे जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद दादा चंदनशिवे यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना मी राहतो तो परिसर खरेच एक मोठे ऊर्जा स्थान आहे. कारण या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापन केलेले पाशुपातीय लिंग व वीरकर गणपती आमच्या भागात आहे. त्यामुळेच या भागातील व्यापारी, चेम्बर ऑफ कॉमर्सचे पदाधीकारी, जेष्ठ विधीज्ञ, पतंजलीचे प्रमुख अशा अनेकांना या धार्मिक स्थळापासून प्रेरणा मिळत आहे. यानंतर श्री सिद्धरामेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सोलापूर महानगरपालिकेचे नेतृत्व आनंद चंदनशिवे यांनी करावे आणि तसेच सर्वसामान्य माणूस असामान्य हे त्या व्यक्तीच्या कार्यावरून ठरतो असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या भागातील नागरिकांना या वीरकर गणपती मंदिराचा सदुपयोग होणार आहे सोलापूर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सोलापूरमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते आनंद चंदनशिवे यांचे नेतृत्व फार मोठ आहे. ह्या नेतृत्वाला या भागातील नागरिकांनी आनंद चंदनशिवे यांच्यासारखं नेतृत्व जपावं भविष्य काळामध्ये हे महानगरपालिकेमध्ये निवडून येतीलच व सोलापूर महानगरपालिकेचे नेतृत्व करतील ही मला खात्री आहे.
वरील कार्यक्रम प्रसंगी मुख्य आरोग्य निरीक्षक लोखंडे साहेब, आरोग्य निरीक्षक बच्चू, आरोग्य निरीक्षक साळुंखे, आरोग्य निरीक्षक बद्दूरकर, आरोग्य निरीक्षक राठोड, आरोग्य निरीक्षक मोरे, आरोग्य निरीक्षक मस्के, आरोग्य निरीक्षक गदवालकर, एस के ग्रुपचे संस्थापक रविकांत कोळेकर, सुहास सावंत, जीवन शिंदे, श्रीनिवास येनगंदुल, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत सोनवणे, आदित्य चंदनशिवे, शेखर कांबळे, गौतम शिंदे, भीमराज मस्के, जरा सांगे, रोहित वाघमारे, साईनाथ मस्के, राजू साबळे, पप्पू शिंदे, प्रशिक बाबरे, प्रथमेश सुरवसे, प्रतीक वाघमारे, बंटी तळभंडारे, अनिकेत जवळकर, रवी सकट, रीतेश भोसले, सिद्धार्थ तळभंडारे, अरुण सुतार, तुषार वाघमारे, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे असंख्य भक्तगण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पुजारी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार वीरकर गणपतीचे पुजारी हक्के सर यांनी मानले. हा जिर्णोद्धराचा कार्यक्रम करण्यासाठी अहोरात्र काम करणारे सुनील मातगुंडी व दुधाळ यांचा सत्कार ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष यांच्याकडून सत्कार करण्यात आला.