सोलापूर, दि.10 – प्रदीप उमरजीकर यांनी कलेच्या क्षेत्रात वेगळी वाट चोखाळुन मिळवलेले यश प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी काढले.
महानायक अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या विविध चित्रपटातील अविस्मरणीय प्रसंगावर आधिरित काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या नुतन बीग बी दिनदर्शिकेचे प्रकाशन कारंजे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अग्निपथ हा चित्रपट पंचवीस वेळा पाहिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिध्देश्वरांच्या क्रुपाआशिर्वादामुळे प्रशासनात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र राहिन असेच काम करेन अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
प्रारंभी संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, सायली जवळकोटे, प्रदीप उमरजीकर यांचीही भाषणे झाली. यावेळी उमरजीकर परिवारातर्फे कारंजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वर्षा चिटणीस, छाया उमरजीकर, शिरीष उमरजीकर,अभिषेक उमरजीकर,अथर्व उमरजीकर, खंडेराव कडबाने, शशिकांत वसंतपुरे, रमेश शेट्टी, लियाकत शेख, दत्ता खैरमोडे, अखलाख मुच्छाले , धिरज शाहा, एपोरा टेलर, राजू नवले, साहिल , भिमाशंकर आलुरे, मल्लेश शावणकर,रवी म्हेत्रे, राजू पेद्दी,मेघराज कल्लावाले, मल्लिनाथ कोळी, गुलाब तांबोळी, भाऊ वलेकर, गोपी धायगुडे, सतीश होनराव, अमोल पवार, सिध्दाराम बावगे,मल्लिनाथ कारकल,निंगप्पा हिपळे, संतोष क्षीरसागर, बसवराज हतुरे, प्रशांत कोकरे,राहूल वलेकर, सिध्दाराम हिपळे, सचिन वाघमारे उपस्थित होते.