सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात दररोज निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात .एकीकडे सुगीचे दिवस सुरू झाल्यामुळे हजारो भोरड्या पक्षांचे आसमंतातील थवे आणि सिद्धेश्वर तलावात विविध पक्षांचे दर्शन करण्याची सोलापूरकरांना संधी मिळते. तांबडं फुटणं तसेच सोनेरी किरण दररोज वेगवेगळी रुप घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच सिद्धेश्वर तलाव आणि ऐतिहासिक अशा भुईकोट किल्ल्यावर पडतात. एकीकडे हुडहुडी भरायला लावणारी थंडी तसेच त्यांनी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेले सिद्धेश्वर मंदिर असा हा सुंदर अविष्कार पाहण्याची अनोखी संधी सिद्धेश्वर तलाव परिसरात मिळत आहे