येस न्युज मराठी नेटवर्क : डॉ. मेतन फाउंडेशन आणि व्हि. मेतन क्रिएशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने बॉलीवूडमधील दिग्गज गायकांना श्रद्धांजली अर्पण करीत “व्हिसलिंग अँड सिंगिंग” अनमोल गीत हा अनोखा कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत यशस्वीपणे आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलीवूड व मराठी सिनेसृष्टी त्यामधील जुनी, प्रसिद्ध व मधुर गीते शीळ आणि गायन यांचं उत्तम संगम घडवून सोलापुरातील रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात मुंबईचे शिरीष जोशी व अपर्णा नाईक यांनी शीळ वाजवून तसेच सोलापूरचे जयंत पानसरे व मुंबईचे कुसुम गोड्रो यांनी आपल्या मधुर गायनातून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमिषा वालावलकर यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रकाश कासेगावकर यांनी ध्वनी, विलास हुमणे यांनी प्रकाश योजना, रघुनाथ नाईक आणि सोनू देवेंद्र यांनी स्टेज व्यवस्था केली.
या कार्यक्रमासाठी सोलापुरातील रसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून गायकांच्या प्रत्येक गाण्यास टाळ्या वाजवून उत्तम दाद दिली. कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वे रसिकांनी या अनोख्या “व्हिसलिंग अँड सिंगिंग” अनमोल गीत कार्यक्रमाचे सर्व कलाकारांचे तोंडभरून कौतुक केले व डॉ. मेतन फाउंडेशन आणि व्हि. मेतन क्रिएशनचे अभिनंदन केले..
डॉ. मेतन फाउंडेशन आणि व्हि. मेतन क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम क्षेत्रात पहिले पाऊल उचलले आहे. नजीकच्या काळात सोलापुरातील रसिकांसाठी अनोखी व चांगले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असे डॉ. व्यंकटेश मेतन सांगितले. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी आभार मानले आणि सर्व कलाकारांना सोलापुरी चादर भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमेश्वर लवंगे, चिदानंद मुस्तारे, महेश बनसोडे, प्रल्हाद कांबळे, श्रीनिवास मेतन, सिद्धाराम सक्करगी, बसवराज साखरे, श्रीनिवास येले, विद्या मनुरे, सीमा गंजाळे यांनी परिश्रम घेतले.