पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. आज (22 डिसेंबर) त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधे अखेरचा श्वास घेतला.
2019 मध्ये पुण्यातील कसबा मतदार संघातून त्या निवडून आल्या होत्या. त्याआधी अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. सलग चारवेळा पुणे महापालिकेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेय. लोकमान्य टिळकांच्या पणती सुन म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. मात्र आमदार झाल्यावर त्यांना लगेच कर्करोगानं ग्रासलं होतं. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीत अत्यवस्थ असतानाही एम्ब्युलन्समधून जाऊन मतदान केलं होतं. प्रकृती ठिक नसताना आमदारांनी पुण्याहून मुंबईला येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले होते. त्यावेळी त्यांची महाराष्ट्रभर चर्चा झाली होती. भाजपच्या फायटर आमदार म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं.