नमस्कार
आज आपण विधानसभेत सोलापूरच्या विमानसेवेबाबत जे वक्तव्य केले ते मनाला पटणारे नाही… बोरामणी विमानतळ जेव्हा व्हायचं तेव्हा होईल… आज आठ वर्षानंतर सुध्दा बोरामणी विमानतळाची जागा पूर्ण Acquire झालेली नाही त्यामुळे भविष्यात अजून किती वर्षांत ते चालू होईल हे ब्रम्हदेव सुध्दा सांगू शकणार नाही… आज मी Travel Agency चालवतो… आणि सोलापूर सर्वच बाबतीत किती मागे पडत चाललं आहे ते मी डोळ्याने बघतोय… मी माझ्या Clients ची गुलबर्गा- तिरुपती व गुलबर्गा- दिल्ली विमान तिकीट काढून देतो तेव्हा एक सोलापूरकर जो त्रास होतो तो शब्दात नाही सांगू शकत… काही बालपणी असणारे सुंदर आणि टुमदार शहर ज्या प्रमाणे बकाल होत चाललंय ते खरंच बघवत… इथं असं कोणतंही कारण दिसत नाही आपल्याला रहावं वाटेल… कुटुंबच्या कुटुंब स्थलांतरित होत आहेत… ज्यांना काहीच पर्याय नाहीत ते फक्त सोलापूररात रहात आहेत… तरूण पिढी जी एखाद्या शहराची Happening Power असते ती तर पूर्णपणे सोलापूर सोडून जात आहेस… आणि या सर्व गोष्टींना पूर्णपणे इथले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत… मला कोणत्याही एका पक्षाला नावं ठेवायची नाहीत पण एकदा निवडणूक संपली की सर्व राजकीय मतभेद विसरून इथले लोकप्रतिनिधी एकत्र भांडले आहेत… एकत्रपणे त्यांनी एखादा विषय लावून धरला आहे असं कधी ऐकलं बघितलं नाही… एक सच्चा सोलापूरकर म्हणून आपल्या मार्फत सर्व लोकप्रतिनिधी… राजकीय नेते मंडळी यांना मी कळकळीचं आवाहन करतो की सर्व मतभेद विसरून फक्त सोलापूररच्या विकासासाठी एकत्र या… जे जे जमेल ते प्रयत्न करा… पण सोलापूरात विमानसेवा… मोठे मोठे उद्योग… दररोज पिण्यायोग्य पाणीपुरवठा… चांगले रस्ते… व कुटुंबांना विरंगुळ्यासाठी चांगली पर्यटन स्थळे विकसित करा… जात पात धर्म आणि राजकारण सोडून फक्त सोलापूरचा विकास व्हावा… अन्यथा पुढे जाऊन सोलापूर निवृत्त नागरीकांच शहर म्हणून ही राहणार नाही…