राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. शहरात असलेले रहिवासीही मतदानासाठी गावाकडे निघाले आहे. मतदानासाठी गावाकडे निघालेल्या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मतदानासाठी बाहेर जिल्ह्यात असलेली मंडळी गावाकडे परतत आहे. ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी औरंगाबाद येथून सारणीकडे दुचाकीवरून जात असलेल्या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नेकनुर मांजरसुंबा रस्त्यावर गवारी जवळ घडली आहे. श्रीकृष्ण अनिल गायकवाड वय ३५ वर्ष रा. आनंदगाव सारणी असं मृत तरुणाचं नाव आहे. औरंगाबाद येथे असलेला श्रीकृष्ण गायकवाड हा आज होणाऱ्या मतदानासाठी गावाकडे मोटार सायकल क्र. एम एच २० सीएक्स ११०२ ने जात होता. केज मांजरसुंबा रस्त्यावर असलेल्या गवारीजवळ आला असता समोरून आलेली भरधाव इनोव्हा कार क्र. एम एच २० एल ९००९ ने मोटार सायकल ला जोराची धडक दिली.