सिईओ स्वामी प्रशिक्षणासाठी रवाना
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सिईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचेकडे सुपूर्द केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात विभाग प्रमुख यांचे बैठकीत आज सिईओ दिलीप स्वामी यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे यांचा आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना पुष्पगुच्छ व मिठाई व देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांचेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजा बाबत मार्गदर्शन करून त्यांनी विभाग प्रमुखांची ओळख करून दिली. नुतन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सिईओ दिलीप स्वामी यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
नाविण्य उपक्रमाचे सातत्य टिकवा – सिईओ दिलीप स्वामी
जिल्हा परिषदे च्या विभाग प्रमुख यांची बैठकीत आज सिईओ दिलीप स्वामी यांनी विविध राबविलेल्या ३८ अभियानाची माहिती देऊन या उपक्रमाचे सातत्य टिकवून ठेवा. नव्याने नियोजन करून दिलेल्या उमेद अभियान अंतर्गत महिला डेअरी प्रकल्पाची अंमलबजावणी करणेचे सुचना विभाग प्रमुख यांना दिल्या.