सोलापूर : सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा नीलकंठ सहकारी बँक यांच्या विद्यमान महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं आहे. शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात हे व्याख्यान होणार असून युवा काल आज आणि उद्या असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल. याच कार्यक्रमांमध्ये कीर्ती भराडीया या साहस स्विमीग करणाऱ्या युवतीचा सोलापूर माहेश्वरी समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माहेश्वरी संघाचे प्रदेशाध्यक्ष किसन भन्साळी, सचिव मदनलाल मनियार उपस्थित राहणार आहेत. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली यावेळी माहेश्वरी सभेचे अध्यक्ष जवाहर जाजू ,गोविंद लाहोटी, नीलकंठ बँकेचे चेअरमन चंद्रकांत तापडिया, गिरीश जाखोटिया, धनराज नोगजा आदी उपस्थित होते.