येस न्युज नेटवर्क बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशननं अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. त्यानं 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 138 चेंडूत 200 धावांचा शिखर गाठला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली.