येस न्युज नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पण समृद्धी महामार्गावर प्रवास करताना नेमका किती टोल भरावा लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. समृद्धी महामार्गावर “जेवढा प्रवास तेवढाच टोल” अशा पद्धतीने टोल आकारणी केली जाणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गावर फक्त एक्झीट पॉईंटवरच टोल बूथ असणार आहेत.
नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सध्या सुरू होत आहे. या पहिल्या टप्प्यात 19 टोलबूथ आहेत… छोट्या चार चाकी वाहनांसाठी प्रति किमी 1 रुपये 73 पैसे टोल निश्चित करण्यात आला आहे.. म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचे 520 km अंतराकरिता 900 रुपये टोल भरावा लागणार आहे… तर मुंबई पर्यंतच्या 701 किमीच्या प्रवासासाठी साधारण पणे बाराशे रुपयांचा टोल लागणार आहे. हलक्या व्यावसायिक किंवा मालवाहतुकीच्या वाहनांसाठी 2 रूपये 79 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे. बस अथवा ट्रक या वाहनांसाठी 5 रूपये 85 पैसे प्रति किमीचा दर राहणार आहे.. मोठ्या व्यावसायिक वाहनांना 6 रूपये 38 पैसेच्या दराने टोल द्यावा लागणार आहे.