सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कलमन या ठिकाणी नव्याने करोडो रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाढलेल्या गवताने या ठिकाणी पुढे पाठ आणि पाठीमागे सपाट असे चिन्ह बघायला मिळत आहे.या केंद्रातच्या चोहोबाजूंनी खूप मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे.महत्वाचे म्हणजे या ठिकाणाहून जो पाणीपुरवठा होतो.
त्या ठिकाणी देखील उंच उंच असे गवत वाढलेले दिसत आहे .याकडे कोणी लक्ष देणार का ही परिस्थिती अशीच ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भला मोठा खर्च करून जर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्वास्था दिसत असल्याने गावात चांगली चर्चा होत असल्याचे देखील ऐकायला मिळत आहे या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार असाच प्रश्न इथे उपस्थित होत आहे.