सोलापूर : जीत कुने दो मार्शल आर्टची 34 वी जीत कुने दो नॅशनल कॉम्पिटिशन दि.११ ते १३ नोव्हेंबर 2022 रोजी उज्जैन मध्यप्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले आहे.
त्यावेळी प्रमुख अतिथी मध्यप्रदेश चे उच्च शिक्षण मंत्री डॉ.मोहन यादव, ऑल इंडिया जीत कुने डो फाऊंडेशनचे सचिव गुप्ताजी व मार्गदर्शक सुमित गौहर आयोजक – राजेंद्र राठोड, महाराष्ट्र राज्य चे सचिव युवराज जी गायकवाड, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर बालाजी कांबळे, किशोर चंदनशिवे, भास्कर देडे व सोलापूर चे सचिव अभिजीत गायकवाड लेडीज कोच सत्यभामा गायकवाड, सम्राट गायकवाड अनुराग देडे बासिद पटेल ओंकार कटारे विश्वजीत गायकवाड नागेश कांबळे आदी राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोषकुमार इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुमारे 18 राज्यातील 450 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता ही स्पर्धा मध्यप्रदेश उज्जैन च्या क्षीरसागर स्टेडियम मध्ये झाली