सोलापूर : बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉयीज युनियन औरंगाबाद विभाग या संघटनेचं 13 व दुवैवार्षिक अधिवेशन सोलापूर शहरात 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन विद्रोही साहित्य समेलनाचे अध्यक्ष शगणेशजी विसपुते यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे सेक्रेटरी कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान या अधिवेशनासाठी शहरातील विविध संघटनांच्या पदाधिका-याची तसेच विविध कामगार चळवळीतील कार्यकर्ते यांना सोबत घेवून एक व्यापक स्वागत समितीचे गठण करुन त्याचे अध्यक्षपद सोलापूरचेच प्रसिद्ध वकील कॉम्रेड आर जी म्हेत्रस यांचे कडे सोपवण्यात आले आहे.
यापूर्वीही संघटनेचं अधिवेशन 1992 साली सोलापूर शहरात संपन्न झाले होते. संघटनेचं स्थापना अधिवेशन औरंगाबादला 20 जानेवारी 1985 साली पार पडलं. तत्पूर्वी मुंबई विभागाशी मराठवाडा व सोलापूर असा भाग संघटनेसाठी जोडला गेला होता संघटनेने लोकशाही आणि विकेंद्रीकरण या दोन तत्वांना मार्गदर्शक ठरवून वाटचाल सुरू केली होती व आहे. संघटनेने आजवर पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळी व तो विचार पुढे नेणा-या व्यक्ती यांच्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस चालणा-या या अधिवेशनासाठी मराठवाडा, सोलापूर जिल्हा तसेच इतर अनेक राज्यातून सुमारे 700 सभासद येणार असून त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांची अधिवेशन ऐतिहासिक घडवण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस,आर.जी.म्हेत्रस, प्रसाद अतनुरकर,स्वप्नील शिंदे, प्रसिद्ध प्रमुख सचिन काळे आदी उपस्थित होते.