येस न्युज नेटवर्क : टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेर संपलं आहे. इंग्लंडनं भारताला 10 गडी राखून मात दिली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं 168 धावा भारतानं स्कोरबोर्डवर लावल्या. पण इंग्लंडनं फलंदाजीला येत सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत 16 षटकांत 170 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आणि तब्बल 10 गडी राखून विजय मिळवला.