सोलापूर : येथील श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीज् संचलित संगमेश्वर रात्र महाविद्यालय, सोलापूर येथे ई – कॉमर्स पोस्टर प्रेझेंटेशनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पोस्टर प्रेझेंटेशनचे सादरीकरण केले. त्यात ई-कॉमर्स, इ- बिझनेस, ऑनलाईन सेवा, वेबसाईट या विषयांवर पोस्टर सादरीकरण केले. पोस्टर प्रेझेंटेशनचे उद्घाटन संगमेश्वर कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ.आर. व्ही. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पोस्टर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो व त्याच बरोबर ई कॉमर्स चा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास डॉ. गोठे एस. डी. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.वैशाली अचकनळ्ळी व प्रा.रेणुका बिराजदार यांनी परिक्षण केले. या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंटेशन अतिशय उत्तम प्रकारे केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सोनाली जाधव यांनी केले. तसेच हा कार्यक्रम पार पडण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक प्रा. सारिका पाटील यांच्या समवेत प्रा.गुरुदास घनाते, प्रा. सुनिता बनसोडे, प्रा. कल्लप्पा चिकटे प्रा. रेवप्पा कोळी, प्रा. प्रतीक्षा बसाटे, प्रा. मोहन काळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.या कार्यक्रमास विद्यार्थ्यांच्या कार्याचे मान्यवरांनी कौतूक केले.