नवी दिल्ली : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत यंदा ऑस्ट्रेलियात सुरु असून स्पर्धेत अनेक आश्चर्यकारक निर्णय लागत असून पावसाच्या व्यत्ययामुळेही गुणतालिकेत बदल होत आहेत. आज विश्वचषक स्पर्धेत ग्रुप 1 मधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे दोन सामने रंगणार होते. पण मेलबर्नमध्ये होणाऱ्या तुफान पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आज एकही विश्वचषकाचा सामना खेळवला गेला नाही. त्यात साखळी सामन्यांसाठी अधिकचा दिवस नसल्याने सामना रद्द झालेल्या संघाना एक-एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान आजही दोन सामने रद्द झाल्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या चारही संघाना एक-एक गुण देण्यात आला.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. आयर्लंड संघाने बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिल्यानंतर गुरुवारी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अवघ्या एका धावेने झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली. ज्यानंतर आर अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार होता. आधी अफगाणिस्तान-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. ज्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हा सामना दोन्ही संघासाठी सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता.