सोलापूर – सोलापूरच्या मधुकंस संगीत विद्यालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.30/10/2022 रोजी कर्णिक नगरच्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयात सायंकाळी 06:00 वाजता विशेष संगीत सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक नितिन दिवाकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
मधुकंस संगीत विद्यालय हे गेल्या दोन वर्षापासून सुरु असून कर्णिक नगर आणि एकतानगरच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कर्णिकनगर भागात दुसरी शाखा सुरु करण्यात आलेली आहे. या संस्थेचा दुसरा वर्धापन दिन याच भागात साजरा होणार असून यात सात्विकी गड्डम यांचे सरस्वती विणा वादन, मास्टर व्यंकटेश कुमार जाधव व कलाश्री जाधव यांचे सुंदरी वादन तसेच डॉ. संध्या जोशी यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे. सात्विकी गड्डम यांचे सरस्वती विणा वादन शालेय कार्यक्रमांतर्गत अनेकवेळा झालेले आहे. सरस्वती विणा हे वाद्य खुप कमी ऐकायला मिळते, म्हणून या कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. मास्टर व्यंकटेश कुमार जाधव व कलाश्री जाधव ही मुले सुंदरी वाद्याची परंपरा पुढे सुरु ठेवत आहेत. अनुक्रमे इ. 6 वी व इ. 8 वी मध्ये दमाणी विद्यामंदिरात शालेय शिक्षण घेत आहेत. अनेक मान्यवर संगीत सभेत त्यांनी सुंदरी वादन सादर केलेले आहेत. डॉ. सौ. संध्या जोशी या पंडीत प्रभुदेव सरदार यांच्या शिष्य असून त्या प्रख्यात गायिका आहेत. गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट पदवी त्यांना प्राप्त आहे. महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यातील मोठ्यामोठ्या संगीत समारोहामध्ये डॉ.संध्या जोशी यांचे शास्त्रीय गायन झालेले आहे.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सागर दिवाकर करत आहेत. अनेक लहान मोठ्या कार्यक्रमाचे सुत्र संचालन केलेले आहेत. अतिशय कल्पक व खुमासदार सुत्र संचालक म्हणून त्यांची ख्याती आहे. या कार्यक्रमात नितिन दिवाकर व क्षितिस गड्डम हे तबल्यावर साथसंगत करतील तर ओंकार पाठक संवादिनीवर साथसंगत करतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई रमेश मणुरे भुषविणार आहेत. तर जेष्ट रंगकर्मी विद्याताई काळे, कर्णिक नगर-ब चे चेअरमन अशोक काजळे, कर्णिक नगर-अ चे चेअरमन टि.बी. राठोड, एकतानगर चे चेअरमन नंदकुमार बंडगर आणि प्रसिध्द शास्त्रीय गायक गोवर्धन कमटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाचा लाभ रसिक श्रोत्यांनी अवश्य घ्यावा असे आवाहन नितिन दिवाकर, सौ. नम्रता दिवाकर, लक्ष्मीकांत गड्डम, अरविंद लोणी, नंदकुमार स्वामी यांनी केलेले आहे.