येस न्युज नेटवर्क : सध्या राज्यात परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या काळात काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रात आत्तापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं 5 हजार 91 जनावरंही दगावली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची चिन्हे नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेती पिकांसह जमिनीचं देखील नुकसान झालं होते. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या होत्या. तसेच रस्त्यांची अवस्था देखील दयनिय झाली आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे.