सोलापूर प्रतिनिधी ः उत्तर सोलापूर तालुम्यातील कारंबा या गावात अवघ्या दोन वर्षात कारंब्याचा चौफेर विकास होतो आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी, मजूर, शेतकरी आदी घटकांसाठी त्यात भरीव काम होते आहे, हे कौतुकास्पद आहे, पण ही ओळख आणखी वाढण्यासाठी गावाने एखाद्या पीक वा उत्पादनाचा ब्रॅण्ड तयार करुन कारंब्याची ओळख वाढवावी, असे आवाहन राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी कारंबा येथे केले.
कारंबा ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि द्विवार्षिक कार्यअहवालचे प्रकाशन आमदार देशमुख यांच्या
हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पंचायत समितीच्या उपसभापती रजनी भडकुंबे,
भाजपाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, लोकनियुक्त सरपंच सौ. कौशल्या सुतार, सामाजिक कार्यकर्ते नागेश कोकरे, माजी सरपंच मल्लिनाथ तंबाके,
माजी सरपंच बाळासाहेब सुतार, राजशेखर तंबाके, बाजार समितीचे माजी संचालक उत्तरेश्वर भुट्टे, प्रा. विनायक सुतार, ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ.
अश्विनी बहिर्जे, सौ. स्मिता पाटील, सौ. लक्ष्मी बहिर्जे, सौ.कविता भोरे, इन्नूस शेख, अशोक बहिर्जे, श्रीकांत आदाटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष
आप्पासाहेब गुंड, नागनाथ बन्ने, भागवत कत्ते आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या द्विवार्षिक अहवालाचे प्रकाशन
झाले.
देशमुख म्हणाले, चांगल्या माणसाला आणि चांगल्या कामाला नेहमीच साथ मिळते. कारंब्यालाही प्रामाणिक सरपंच मिळाल्यानेच लोकांच्या
अपेक्षा पूर्ण होत आहेत. त्यामुळे लोकांनीही साथ दिली पाहिजे. विरोधी पक्षाने राजकारण न करता विकासाचा दृष्टीकोन ठेवून सहकार्य केले पाह