सोलापूर : यंदाच्या वर्षी काही केल्या पाऊस थांबायचं नावच घेत नाही. राज्यभरात रिटर्न मान्सूनने देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काल सोलापूर शहर जिल्ह्यात मध्यरात्री जवळपास पावणे बारा ते तीन वाजेपर्यंत सुमारे तीन तासाहून अधिक वेळ मुसळधार पाऊस झाला 34 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेती पिकाचे अतोनात नुकसान होऊ लागले आहे. शिवाय रस्त्यांची चाळण झाली आहे. रिटर्न पावसामुळे राज्यभरातील दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे वीर, उजनी धरण शिवाय परंडा जिल्ह्यातील शिना कोळेगाव ही तीनही धरणे तुडुंब भरल्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा सोडून देण्यात आला आहे त्यामुळे सीना ,भीमा, आणि नीरा नदी दुधडी भरून वाहत आहेत पंढरपुरात तर यावर्षी सततच पूर परिस्थिती आहे .का एवढा पाऊस यावर्षी पडतोय ? आणि हा पाऊस कधी थांबणार याची चिंता सगळ्यांना लागली आहे..!