सोलापूर : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सध्या खूपच वाढले आहेत .दररोज नवनवीन प्रकार हे समोर येत आहेत. असाच एक प्रकार सोलापूरच्या तरुणी बाबत घडला असून दावणगिरी येथील एका तरुणा बरोबर लग्न करतो असे सांगून वारंवार त्या तरुणीच्या अकाउंट मधून तब्बल 28 लाख रुपये काढून घेतले आहेत. जनार्दन बसवा रेड्डी, बसवा रेड्डी, आणि बसवाची आई राहणार दावणगिरी अशा तिघा विरोधात सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्न करतो असे सांगून या तरुणीच्या आयसीआयसी बँक तसेच गुगल पे वरून तब्बल 28 लाख 8 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यात हा प्रकार घडला असून याबाबत सोलापूर शहरातील कुंभार वेस मधील एका महिलेने तक्रार दिली आहे.