येस न्युज नेटवर्क : मागील काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याबाबत चर्चांना उधाण येत आहे. परंतु या चर्चांवर आता पूर्णविराम लागणार आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 36 व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम मिटींगमध्ये त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. बिन्नीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची जागा घेतली आहे. 67 वर्षीय रॉजर बिन्नी हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणारे एकमेव उमेदवार होते.