मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पायाभूत सुविधांचा शुभारंभ!
सोलापूर : पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी लोकांना परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर रे नगरच्या माध्यमातून सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांना अत्याधुनिक पद्धतीने अद्यावत सुविधांसह सज्ज असे मजबूत पक्क्या घरांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे साकारत आहे. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधीची तरतूद असून सदर निधीसाठी सातत्याने अव्याहतपणे पाठपुरावा करावे लागत आहे. याच अनुषंगाने ३० हजार घरकुलांसाठी मुबलक पाणी, भूमिगत मलनिस्सार व्यवस्था, अंतर्गत रस्ते, रस्त्यालगतची गटारी यासाठी जवळपास ३०० कोटी रुपयांची गरज असून त्यासाठी लागणारी निधी राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून त्याचे प्रत्यक्ष कामाच्या तपशिलासह कार्याचे आदेश दि. १७/१०/२०२२ रोजी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ कार्यकारी अभियंता ए.बी.खेडकर यांनी पारित केले आहे.
यामध्ये २३६ कोटी हे पायाभूत सुविधांकरिता आणि विजेकारिता ६४ कोटी असे या निधीतून करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते संभाव्य तारीख १९-२० नोव्हेंबर २०२२ करण्यात येणार आहे. हि आनंदाची बातमी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सभासदांना दिली असता सभासदांकडून लाल गुलाल उधळून, लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पायाभूत सुविधांच्या शुभारंभ कार्यक्रमास ५० हजार कष्टकरी लाभार्थी उपस्थित करण्याचा निर्धार या प्रसंगी केले असून रे नगरचे काम जलदगतीने प्रगती पथावर जात असून याकामी सहकार्य करत असलेल्या केंद्र व राज्य सरकार व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केले.
मंगळवार दि. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे रे नगरच्या पायाभूत सुविधांकरिता ३०० कोटी रुपयांचे मंजूरीसह कार्यादेश पारित झाल्याने रे नगर सभासदांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सभासदांना संबोधित करताना आडम मास्तर म्हणाले कि, दि. ११ व १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत मंत्रालय येथे रे नगर संदर्भात स्वतंत्र बैठक पार पडली. या बैठकीत गृहनिर्माण प्रकल्पाची अद्यावत स्थिती, प्रगती, वस्तुस्थिती आणि अडचणी संदर्भात माहिती देण्यात आली. यावर सकारात्मक चर्चा करून प्रकल्पाला कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत व प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार करणार असल्याचे आश्वासित केले.
३० हजार असंघटीत कामगारांचा हा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्ष कामगारांच्या हिश्यापोटी प्रत्येकी किमान २ लाख रुपये भरावे लागणार आहे. याकरिता वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत अत्यल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेतलेले आहे. यामुळे लाभार्थ्यांना सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. सद्यस्थिती १० हजार घरे बांधून तयार असून उर्वरित घरे युद्धपातळीवर निर्मितीचे काम चालू आहे. आतापर्यंत १० हजार घरांसाठी पहिल्या टप्प्यात १८ कोटी रुपयांचे काम झाले असून पुढील ४६ कोटी रुपयांचे वीज जोडणीचे उर्वरित काम युद्धपातळीवर सुरु आहे.
यावेळी सिटू चे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव युसूफ शेख मेजर, सिद्धप्पा कलशेट्टी, मुरलीधर सुंचू, दाऊद शेख, नरेश दुगाने सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, कुरमय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, अँड.अनिल वासम, दीपक निकंबे,वीरेंद्र पद्मा, जावेद सगरी,अकिल शेख, गजेंद्र दंडी, नागेश म्हेत्रे, बाळासाहेब मल्ल्याळ, विजय हरसुरे, अशोक बल्ला, रवींद्र गेंट्याल,प्रवीण आडम, तबसुम शेख, आसिफ पठाण राजेश काशीद,अमोल काशीद, नितीन गुंजे,नितीन कोळेकर, बजरंग गायकवाड, सिद्राम गायकवाड, आफताब बागलकोट ,धनराज गायकवाड, मल्लिकार्जुन बेलीयार,इब्राहिम मुल्ला, अमिना शेख, जुबेर सगरी, शबाना सय्यद, पांडुरंग म्हेत्रे, शिवा श्रीराम, प्रकाश कुऱ्हाडकर, बालाजी गुंडे, सनी आमाटी, प्रशांत विटे, सेनापती मरेड्डी, मल्लेशाम कारमपुरी, स्वस्तिक पुजारी, मंदार अंतरोळीकर, संतोष पाटील, मोहसीम पठाण ,शाम आडम,आदी उपस्थित होते.