सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ ,येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मधील खेळाडू कुमारी साईसमिता समीर जवळकर व महेक अन्वर बागवान यांची 24 व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा माराप्पार (तामिळनाडू )येथे होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य टेनिस व्हॉलीबॉल संघात निवड झाली होती. सदर 24 व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल सब ज्युनिअर मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्ण पदक पटकावले.
सदर खेळाडूंची निवड ही बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल करण्यात आली होती. दोन्ही खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक रवींद्र चव्हाण, शाळेतील क्रीडा शिक्षक अतुल सोनके, सागर जगझाप, महादेव वाघमारे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी खेळाडूंची संस्था अध्यक्ष माननीय महेश अण्णा कोठे, डॉक्टर राधिका चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, प्राध्यापक विलास बेत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष अभिनंदन केले आहे.