सोलापूर : सुजाता व अरुण लोहकरे यांनी लिहिलेल्या ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ या पुस्तकाच्या दुसर्या आव्ृत्तीचे प्रकाशन शनिवार दि, १५ रोजी करकंब (पंढरपूर) येथील चौंडेश्वरी मंदिरात दुपारी ४.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिक्षण अभ्यासक, लेखक संदीप वाकचौरे, पुणे डाएटच्या अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी संदीप वाकचौरे यांचे ‘मुलांना वाढवताना नव्हे, मुलांसोबत वाढताना’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या पुस्तकातील निवडक भागाचे अभिवाचन होणार आहे. यामध्ये प्रा. सुवर्णा तोरणे, सुनील दुधाणे, सुजाता लोहकरे अभिवाचन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सुजाता व अरुण लोहकरे यांनी केले आहे.