मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात ईडीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर केली होता. मात्र ईडीने जामीन विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीच्या प्रकरणात हायकोर्टानं जामीन दिल्याच्या निर्णयात हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने मनी लॉंड्रिंग प्रकरणी जामीन मंजूर केला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने उच्चल न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला. ईडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत यावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला.