येस न्यूज नेटवर्क : सणासुदीचे दिवस आले की सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होते. अशातच ऐन सणांच्या दिवसात सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. दिवाळीच्या आधीच डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे. तूर डाळीच्या किंमतीत मागील आठवड्याभरात चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. त्यासोबतच खाद्य तेल आणि उडीद डाळ यांच्याही किंमतीत वाढ झाली आहे. घाऊक बाजारासह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतीचा परिणाम आता जाणवू लागला आहे. उत्पादनात घट होण्याच्या भीतीने डाळींची दरवाढ करण्यात आलेली आहे. मागील आठ दिवसांमध्ये तूर डाळीच्या किंमतीत चार ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. सध्या तूर डाळीचा घाऊक बाजारातील दर प्रति किलो 110 रुपये आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीचा दर 125 ते 130 रुपये किलो एवढा आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे डाळीच्या पिकांना मोठ्या परमनंट फटका बसला आहे. डाळीच्या पिकांचे पावसात खूप नुकसान झाले आहे. येत्या काळात डाळींचे पिकं घटण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. एकीकडे रुपयांचं मूल्यही घसरत आहे. त्याच सोबत खाद्यतेलाचे दर सुद्धा वाढण्याची भीती आहे. खाद्यतेल 3 ते 4 रुपयांनी महागले आहे. यात आणखी वाढही होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.