मंगळवेढा : संतनगरी मंगळवेढ्यात भाविकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने प्रलंबित असलेल्या पंढरपूर- विजयपूर या रेल्वेमार्गाच्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवेढ्यात माजी नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
कवी इंद्रजीत घुले यांना सोबत घेऊन त्यांनी दामाजीपंताचे,चोखोबा समाधीचे दर्शन घेत चोकोबाचा इतिहास जाणून घेतला. थोर संत महात्मा बसवेश्वर यांचा इतिहासही जाणून घेतला,चोखोबा ट्रस्टच्या वतीने अविनाश शिंदे व जयराज शेंबडे यांनी सत्कार केला त्यानंतर पुन्हा जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ देवीचे दर्शन घेतले त्यानंतर कान्होपात्रा मंदीर येथे समाधी दर्शन घेऊन माजी नगराध्यक्ष अरुणा माळी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की इथल्या संतनगरीचा इतिहास मोठा आहे हा इतिहास नवीन पिढीला समजून घेण्यासाठी सर्व नागरिकांच्या पुढाकारातून मास्टर प्लॅनची आवश्यकता आहे त्यासाठी काही तज्ञांची बोलून घेणार असल्याचे सांगत चोखोबा स्मारकाच्या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्या म्हणाल्या.शिवाय हा वैयक्तिक संत भेटीचा दौरा असल्याने त्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेण्याचे टाळले. मंगळवेढ्यातील अनेक नागरिकांशी त्या दिलखुलासपणे संवाद साधून त्यांच्याशी खासदार समवेत फोटो काढून देण्यासाठी त्यांनी वेळ दिला.खा. सुप्रिया सुळे या मंगळवेढ्यातील संतनगरीचा इतिहास पाहण्यासाठी आल्या होत्या मात्र या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाच चकवा देत कवी इंद्रजीत घुले यांना सोबत घेऊन त्यांनी दामाजीपंताचे दर्शन घेऊन पुन्हा त्या चोखोबा समाधी, मारुती पटांगणातील दुर्गा देवीचे दर्शन घेतले.सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांच्या निवासस्थानी भेट घेतली शहा व परिवाराच्या वतीने व डाॅ प्रणिता भालके यांनी खा. सुळे यांचा सत्कार केला. पक्षासाठी केलेल्या कामाचा अहवाल त्यांनी सादर केला. यावेळी भगीरथ भालके,राहुल शहा,लतीफ तांबोळी, रामचंद्र जगताप,पी बी पाटील, चंद्रशेखर कौडूभैरी, माजी नगराध्यक्ष अरुणा माळी सोमनाथ माळी संगीता कट्टे उपस्थित होते. चोखामेळा समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्याबरोबर दामाजी उपाध्यक्ष तानाजी खरात अजित जगताप विजय खवतोडे,प्रकाश गायकवाड प्रवीण खवतोडे, अविनाश शिंदे जयराज शेंबडे उपस्थित होते त्यानंतर 52 वर्षाचा परंपरा असलेल्या जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाचे देवीचे दर्शन घेतले परंतु या दौऱ्यातील गर्दी पाहता या दौऱ्यातून चकवा दिला