सोलापूर : येथील सौ देवांशी अक्षय जव्हेरी यांचे डी.जे गरबा क्लासेस ला यंदाच्या चौदाव्या सीजन ला उत्तम प्रतिसाद मिळाले सौ देवांशी या गेल्या तेरा वर्षांपासून सोलापुरात गुजरात येथील पारंपरिक गरबा, दांडिया सह अनेक विविध स्टाईल्स शिकवत असून सोलापुरातील त्यांचे डी.जे गरबा क्लास हे एकमेव प्रोफेशनल अकॅडमी असून शहरातील 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी तयार केले आहेत. दोन ताली, तीन ताली, दांडिया, डोधियु, हींच, टप्पा, गडदो, पोपोटियु, फ्री स्टाईल या सारखे विविध प्रकारचे ट्रॅडिशनल स्टाइल्स ते शिकवतात. त्याने यंदाच्या वर्षी गुजरात येथील गरबा क्वीन सौ मेघना यांच्या साथीने नवनवीन तीन विविध बॅचेस मध्ये बेसिक ते ऍडव्हान्स च्या सर्व टप्प्यातील स्टाईल शिकवून शेवटी त्या मेगा शो चे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या वर्कशॉप मध्ये मुंबई, पुणे, नाशिक तथा अमेरिका मधील रहिवासीनी सुद्धा सहभाग नोंदविला या मेगा शो मधून विविध विभागातून बक्षिसे देण्यात आली. सोलापुरातील पहिले गुजराती गरबा अल्बम सुद्धा त्यांच्या डीजे गरबा क्लासेस द्वारे लॉन्च करण्यात आले होते कार्यक्रमास सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व बक्षीस जैन संगिनी फोरम तर्फे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती हसुमती जव्हेरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण अध्यक्ष सौ निशा जैन सचिवा सौ वैशाली जैन व सौ प्रीती कर्णावत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन श्री अक्षय जव्हेरी व सौ कविता पालिया यांनी केले.