सोलापूर : महाराष्ट्राची आराध्य दैवत आई तुळजाभवानी च्या शारदीय नवरात्र महोत्सवात प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट असे महत्व आहे. तसेच संपूर्ण भारतातील विविध प्रांतांमध्ये विशिष्ट असे उत्सव या नवरात्रीत समाविष्ट आहेत. जसे गुजरात मध्ये रास गरबा व रास दांडिया चे आयोजन होते तसेच आंध्रा व तेलंगणा प्रांतात ब्रतुकम्मा चे आयोजन केले जाते.
आंध्रा व तेलंगणा मधुन सोलापूरात स्थायिक झालेल्या तेलगु समाजात ब्रतुकम्मा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षापासून पद्मनगर महिला मंडळ तर्फे या ब्रतुकम्मा सणाचे भव्य दिव्य स्वरूपात महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाने समाजातील महिला व मुलींना आपले पुरातन संस्कृति व मूल्यांची जतन करण्याची शिकवण दिली जाते. ब्रतुकम्मा या सणात विविध रंगाचे व आकाराच्या फुलांच्या आकर्षक पध्दतीने रचना करण्यात येते व त्या भोवती महिला व मुली फेर घेतात. पद्मनगर महिला बहुद्देशीय सामाजिक संस्था व पद्मनगर सांस्कृतिक सेवा व क्रिडा मंडळ तर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत पद्मनगर क्रिडांगण येथे भव्य दांडीया आणि गरबा ही स्पर्धा आयोजित केले आहे. या पत्रकार परिषदेला पल्लवी कनकट्टी , कविता रव्वा, मंजुश्री वल्लाकाटी, अर्चना वल्लाकाटी, माधवी म्याकल, लीना आकेन उपस्थित होते.