बीड : कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारे सगळी सामग्री सुद्धा आता भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणीच्या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा आणि खरंतर परळी शहराची ओळख अगदी या चिमणी वरून ओळखली जायची ती चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा होणार आहे