परमवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम
सोलापूर : परमवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य असे विविध उपक्रम घेतले जातात.परमवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर गणपतीच्या वतीने काल सांयकाळी 7:00 वाजता महिला सशक्तिकरण या संदर्भात पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडुकर यांची प्रकट मूलकात. अनुप्रिता अंदेली CTI यांनी घेतली.यावेळी मंडळाचे संस्थापक राजकुमार परमेश्वर कोळी व उत्सव अध्यक्ष सचिन तुगावे, भास्कर सामलेटी,मुन्ना पवाडे, सिद्धाराम स्वामी, मीनाक्षी कोळी.भाग्यश्री तूगावे,नम्रता तांडुरे, कविता इडे, अरुणा सामलेटी, स्मिता ताडुरे व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपआयुक्त वैशाली कडुकर यांनी त्यांच्या शालेय जीवन प्रवास पासून ते आज एक पोलीस उपायुक्त पर्यत प्रवास कसा झाला याची प्रकट मुलखात मध्ये सागितलं.तसेच स्त्रिया आज अबला राहिलेल्या नाहीत. त्यांची झेप आणि कर्तृत्व आज सर्वदूर पसरले आहे. स्त्री सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. आर्थिक, मानसिक, सामाजिक सर्व दिशा तिच्यासाठी सुरक्षित आणि स्वतंत्र असल्या पाहिजेत.स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा योग्य प्रकारे तिची परिस्थिती हाताळली गेली पाहिजे. शिक्षण आणि कामासाठी स्त्रियांना बाहेर पडावे लागते. एक सुव्यवस्था त्यामध्ये आली पाहिजे. मागील दोन दशकात स्त्री शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण झालेली आहे. आता गरज आहे तिला योग्य कर्तृत्व देण्याची आणि तिला सक्षम बनवण्याची जीवनात आणि समाजात मुक्त जगण्यासाठी प्राथमिक कार्य कोणते असेल तर ते म्हणजे स्त्रियांचे सशक्तीकरण महिला सशक्तीकरण करताना अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून स्त्रीला स्वतंत्र असल्याची जाणीव आणि तसे शिक्षण दिले गेले पाहिजे. कौटुंबिक आणि आईचे संस्कार याबाबतीत खूप महत्त्वाचे ठरतात. मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्री कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकते. तिला कठीण आणि धाडसी कार्य करायला लावणे, शारीरिक कष्टदेखील करायला लावणे गरजेचे आहे. शारीरिक सक्षमता येणे गरजेचे आहे.शिक्षणामुळे बौद्धिक विकास होतो परंतु खेळामुळे व व्यायामामुळे शरीर आणि मन कणखर बनते. अशी स्त्री एक सुंदर कुटुंब आणि समाज घडवू शकते. त्यामुळे शिक्षणाच्या मार्गात मुलींना ही मुलांसारखे भवितव्य घडवण्यासाठी संधी प्राप्त व्हायला हव्यात. असे मत त्यांनी आपल्या प्रकट मुलाखतीत मांडले.
वीर गणपतीच्या वतीने दिनांक 31 8 2022 ते 09-09- 2022 पर्यंत हास्य दर्पण,प्रकट मुलाकात, मटकी फोड स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत बॉल स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, फनफेअर विविध खाद्यपदारांचे स्टॉल त्याचबरोबर पाककला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी उपक्रम घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आरोग्य च्या दृष्टीने भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर अश्या विविध उपक्रम वीर गणपतीच्या वतीने घेण्यात येणार आहेत.