येस न्युज मराठी नेटवर्क : आज चीनमध्ये दुसऱ्या महायुद्ध आपली वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या सोलापुरातील स्मारकास भेट देण्यासाठी चीनचे भारतातील राजदूत सून विडोंग व त्यांचे शिष्टमंडळ आले असताना आडके हॉस्पिटल व आडके फाउंडेशन, सोलापूर यांच्यातर्फे डॉ. कोटणीस यांच्या नावे सोलापुरात मोफत वैद्यकीय सेवा तसेच चीनमध्ये गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याबाबत प्रस्ताव देण्यात आला.आडके हॉस्पिटल हे आपल्या दर्जेदार व गोरगरिबांना माफक सेवा देण्याबाबत प्रसिद्ध आहे.परंतु डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचे आपल्या नावे एक हॉस्पिटल सोलापुरात असावे असे स्वप्न होते व ते स्वप्न साकार करण्यासाठी सुरुवातीला भैया चौकातील डॉ. कोटणीस मेमोरियल स्मारकामध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून नंतर सोलापूर महानगरपालिकेच्या मदतीने जुनी मिल कंपाऊंड, भैय्या चौक येथे एक अदययावत इस्पितळ सुरू करण्याचा मानस आडके हॉस्पिटल व आडके फाउंडेशन तर्फे चीनच्या राजदुतांना व कोटणीस मेमोरियल ट्रस्टला देण्यात आला आहे अशी माहिती डॉ.संदीप आडके यांनी दिली.