उतर सोलापूर – मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जि.प.सोलापूर यांच्या संकलपनेतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जात्मक शिक्षण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतून सर्व विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी दशसूत्री कार्यक्रमाचे अमलबजावणी करताना शिक्षकानी आपले विद्यार्थी व समाजाचे ताण तणाव दूर करावेत व गुणवत्ता पुर्ण शिक्षण द्यावे असे आवाहन उतर सोलापूर मधील नान्नज बीट च्या शिक्षण परिषदेत सिंहगड महाविद्यालयात केगाव येथे केलेशिक्षण परिषदेचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन, दीप परज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले परिषदेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बापुराव जमादार होतें
परिपाठ, रानवाटा या मारुती चितमपल्ली यांच्यां पुस्तकाचं वाचन वैशाली सिवगुंडे बाळे यानी केले , सरस्वती पवार यानी भाषा निपुण भारत बाबत विषय समजावून सांगितले, दशसुत्र बाबत बापुराव पाटील, नागणे मॅडम यानी सविस्तर मार्गद्शन केले या परसंगी सेवानिवृत्त झालेले मुख्या ध्यापक शोभा रमण शेट्टी, पांडुरंग साठे, तसेच सुवर्णा दुरंडे, पर्भावती मोदी, तसेच विस्तार अधिकारी पदोन्नती बाबत छाया पवार आदींचा सन्मान शिक्षण अधिकारी डॉ किरण लोहार यांच्यां हस्ते करण्यात आले
कोरोनाकाळामध्ये पहीली ते तिशरी बरोबर सर्वच मुलांचे शैक्षणिकनुकसान भरून काडण्याचे आवाहन तसेच शि ष्यावृती, स्पर्धा परीक्षा, प्रज्ञावान विद्यार्थी शोध मोहीम, बरोबर इसापनीती च्यां गोष्टही मुलांना सांगून संस्कारक्षम, गुणवंत विद्यार्थी घडवावे असेही डॉ किरण लोहार यांनी बोलून, शिक्षण परिषदेच्या उत्कृष्ठ नियोजन बाबत गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख याचे कौतुक केले
उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उतर तालुक्यातील नान्नज बीटची शिक्षण परिषद सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी आयोजित करण्यात आली होती.
शिक्षण परिषदेमध्ये , नान्नज, कलमन, मार्डी बाळे केंद्रातील 211 शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित राहून लाभ घेतले
याप्रसंगी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या मिले सुर मेरा तुम्हारा या कार्यक्रमात उतर सोलापूर तालुक्यांची उत्कृष्ठ सादरीकरण केल्याबद्दल सहभागी कलाकार शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले
गटशिक्षणाधिकारी बापुराव जमादार यांनी शिक्षकांना प्रशासकीय विषयासह , दशसूत्री कार्यक्रमसह, शिष्यवृत्ती परीक्षा सराव, इंस्पायर अवार्ड, विज्ञान प्रदर्शन आदी विषयावर विविध ऑनलाईन माहिती भरणे बाबत मार्गदर्शन केले आले.दशसूत्री कार्यक्रमाचे तालुक्यात प्रत्येक शाळेत प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विस्ताराधिकारी सिध्देश्वर निंबरगी ,केंद्रप्रमुख परमेश्वर जमादार, विठ्ठलसिंह रजपूत , मल्लिनाथ निंबरगी , छाया पवार यांनी सर्व शिक्षकांना आवाहन केले. याप्रसंगीशिक्षण धिकारी डॉ किरण लोहार यांचे स्वागत सन्मान बापूराव जमादार यानी केले मुख्यालयाचे विस्तार अधिकारी हरीश राऊत उपस्थित होते
शिक्षक संघटनेचे मच्छिंद्र नाथ मोरे , बाबा, माने, यांनी आपली मनोगत व्यक्त केले, गुणवत्तापर्ण शिक्षण, विविध उपक्रम राबवताना अशैक्षनिक कामे , उपक्रम कमी करून शिक्षण परिषदेची वेळ पुर्ण दिवस वाढवून मिळावे, अशी मागणीही केली याबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले
शिक्षण अधिकारी यांचे भावनिक आवाहन,- कोरोणामुळे अनेक चांगली माणस गेली, आपणं राहिलेल्या माणसांची काळजी घ्या अजून कोरोणा संपला नाही असे भावनिक आवाहन करून अती वेगाने वाहन चालविणाऱ्या गुरूजींना सबरीचा सल्लाही दिलासुरक्षित घरी येत जावा असे हि डॉ लोहार सांगीतले
परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व केंद्रप्रमुख व विषय साधन व्यक्ती विशेष तज्ञ , फिरते शिक्षक चंद्रकांत वाघमारे, निलेश शिरवळकर, सितल विधाते , मंगेणी सोंकडे, संजय पाटील , काशीद, यांनी उत्कृष्ठ नियोजन केले होते. ,
परिषदेचे सूत्र संचलन शिवणीचे अपर्णा तुळजापूरकर यांनी केले , छाया पवार यानी आभार मानले वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली,