नवी दिल्ली : देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत. तर विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय झाला. त्यानंतर जगदीप धनखड यांच्यावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मार्गारेट अल्वा यांचा पराभव
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून हा निकाल जाहीर झाला. एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड विजयी झाले