स्व. विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर व कोठे’ज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड इंडोस्कॉपी सेंटर चे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे आयोजित जेष्ठ नेते स्व.विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व कावीळ तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन सोलापुरातील उदयोन्मुख गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनानुसार सुशील रसिक सभागृह येथे घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्या शुभहस्ते व धन्वंतरीदेवता, स्व. विष्णुपंत कोठे,स्व. कौशल्या काकू कोठे, स्व.राजेश अण्णा कोठे, यांच्या प्रतिमांचे पूजन करून व नामवंत डॉ. अरुण बाकळे, डॉ. अमजद सय्यद, डॉ. विशाल गोरे, डॉ. नीलरोहित पैके, डॉ. पूनम भुतडा, माजी महापौर महेश अण्णा कोठे, माजी महापौर सौ. श्रीकांचना यन्नम, आरिफ भाई शेख, शिवलिंग कांबळे (बाटलीवाला), नगरसेवक देवेंद्र दादा कोठे, नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, श्रीनिवास चिल्का डॉ.सौ. राधिकाताईचिल्का , नगरसेवक विनायक दादा कोंड्याल, श्रीनिवास बोद्दूल सौ. श्रुती सूर्यप्रकाश कोठे, श्रीमती सुहासिनी कोठे, डॉ. सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी श्रीयुत सिरसट सर व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्व. तात्या साहेबांवर केलेल्या गीतातून आदरांजली वाहिली. मान्यवरांचे स्वागत नगरसेवक देवेंद्र दादा कोठे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. महेश अण्णा कोठे यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले स्व. तात्या साहेबांनी घेतलेला समाजसेवेचा वसा कोठे परिवार वेगवेगळ्या माध्यमातून पुढे चालवत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांनी डॉ . सूर्यप्रकाश कोठे यांच्या कार्याचे कौतुक करत सदर काम अधिक चांगल्या पद्धतीने करावे यासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व मार्गदर्शक डॉ.सूर्यप्रकाश कोठे यांनी या शिबिरांतर्गत होणाऱ्या हेपेटाइटिस बी(कावीळ) हेपेटाइटिस सी(कावीळ)एल. एफ. टी. यकृतकार्य चाचणी, मधुमेह तपासणी, इसीजी, फायब्रो स्कॅन( यकृत कार्य तपासणी), डेंटल चेकअप आदि तपासण्या व मोफत औषधोपचार यांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी डॉ. अमजद सय्यद, डॉ. विशाल गोरे, यांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले. या शिबिराचा लाभ सोलापुरातील 473 गरजू रुग्णांनी घेतला. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे, माजी नगरसेवक हरिदास गायकवाड, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, श्री रमेश यन्नम, व्यंकटेश चिलका, सुधाकर गुंडेली, नागनाथ क्षीरसागर, बिज्जु अण्णा प्रधाने, मदन क्षीरसागर, यशवंत बापू ढेपे, विश्वनाथ पाटील, सुरजसिंह चौहान, सलाम शेख, ए.डी. चिनीवार, माजी प्राचार्य श्री अंबादास चाबुकस्वार सर, नंदकुमार मुस्तारे, आनंद मुस्तारे, सुरेश कोकटनूर, माजी नगरसेवक नारायण माशाळकर, गिरीश कोटा, श्री. अजय पोंन्नम काशिनाथ तात्या डोंगरे,मुकुंद चंदनशिवे, गिरीश कोटा माजी प्राध्यापक चंदप्पा केदार, माजी पर्यवेक्षक श्री निर्मल कुमार काकडे, एस. न्यूज चे संस्थापक श्री शिवाजी सुरवसे, माजी नगरसेवक मधुकर आठवले, दिलीप भाऊ कोल्हे, संजय शिंदे, दैनिक दिव्य मराठीच्या अश्विनी तडवळकर, गणेश ननवरे यांनी सदिच्छा भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देगाव नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ.सौ. सोनाली बेंद्रे- महिंद्रकर त्यांचे सहकारी कर्मचारी प्राचार्य श्री. वासुदेव इप्पलपल्ली, प्राचार्य नागेशकुमार काटकर, प्राचार्य अविनाश हजारे, प्राचार्या सुरा मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली मॅडम, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर , शिशुवर्गाच्या मुख्याध्यापिका सुरवसे , मुख्याध्यापिका रणसुभे , विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका पुष्पा नायर, यांच्यासह संस्थेच्या सर्व विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोठेज क्लिनिकचे सर्व कर्मचारी आणि देवेंद्र दादा कोठे मित्रपरिवार, . चिवडशेट्टी यांनी परिश्रम.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले तर मान्यवरांचे आभार विनायक दादा कोंड्याल यांनी मानले.