येस न्युज नेटवर्क : बिहारच्या राजकारणात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारच्या राजभवानात दुपारी 2 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.
नितीशकुमार 2000 मध्ये पहिल्यांदा सात दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 22 वर्षांच्या प्रवासात त्यांनी सहा वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी 8 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा एक मोठा विक्रम आहे. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेका यांना आतापर्यंत अनेकवेळा शपथ घेता आली नाही.