येस न्युज मराठी नेटवर्क : औरंगाबादनंतर आता उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप घेण्यात आला असून, उस्मानाबादच्या नामांतराला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे. शेख इस्माईल मसूद शेख व इतर 16 जणांनी मंत्रिमंडळाच्या 16 जुलै 2022 च्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतराच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ऍड. सतीश बी. तळेकर यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्टरोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता औरंगाबादप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे.