• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, August 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वातावरणीय बदल कृती आराखड्यामध्ये सोलापूर शहर आघाडीवर

by Yes News Marathi
July 27, 2022
in इतर घडामोडी
0
वातावरणीय बदल कृती आराखड्यामध्ये सोलापूर शहर आघाडीवर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जीएचजी उत्सर्जन सूची व संवेदनशीलता मूल्यमापन विषयावर कार्यशाळा

सोलापूर : सोलापूरचे संवेदनशीलता मूल्यमापन आणि हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन सूची या विषयावर सोलापूर महानगरपालिकेतर्फे कौन्सिल हॉल येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले.सोलापूर महानगरपालिकेने महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरासाठी वातावरण बदल कृती आराखडा (कॅप) विकसित करण्यास सुरुवात केली आहे. २०५० पर्यंत नेट झीरो उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने महाराष्ट्राच्या व्यापक एकत्रित प्रयत्नांचा हा एक भाग असून राज्यातील ४३ शहरे आणि नागरी क्लस्टरनी हे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजित केले आहे.वर्ल्ड रिसोर्सस इन्स्टिट्यूट इंडियाच्या (डब्ल्यूआरआय इंडिया) यांच्‍या तांत्रिक सहाय्याने या महानगरपालिकेतर्फे हरितगृह वायू उत्सर्जन व संवेदनशीलता मूल्यमापन या विषयावर अर्ध्या दिवसाच्या क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये महानगरपालिकेतील, राज्य महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर लाइन एजन्सींमधील अधिकारी सहभागी झाले होते.शहराच्या संवेदनशीलता मूल्यमापनावरील पहिल्या सत्रात सोलापूरमध्ये होऊ शकणाऱ्या परिणामांची व्याप्ती आणि वातावरणीय धोक्यांचा आढावा दिला. विशेषतः शहरी उष्णता व हवेचे प्रदूषण, तसेच त्यांचा शहरातील रहिवासी व पायाभूत सुविधांवर होणारा परिमाण याची विस्तृत माहिती या सत्रात देण्यात आली.दुसऱ्या सत्रामध्ये, सोलापूर शहरासाठी हरितगृह वायूंचे आणि क्षेत्रनिहाय योगदानाचे प्राथमिक विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार्यपद्धत व साधने यावर प्रकाश टाकण्यात आला. त्याचप्रमाणे वाहतूक, निवासी आणि अनिवासी इमारती यातिल उर्जा वापर, आणि शहरातील घनकचरा यासारख्या उत्सर्जनातील प्रमुख क्षेत्राचे योगदान देखील स्पष्ट करण्यात आले.सोलापूर महानगरपालिकेने २०५० पर्यंत नेट झीरो उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने आराखडा बनवण्‍याच्‍या प्रक्रियेचा एक भाग म्‍हणून ही कार्यशाळा आयोजित केली होती. त्याचबरोबर, वाढणारे तापमान, हवेचे प्रदूषण आणि दुष्काळ यासारख्या वातावरणीय बदलांशी संबंधित आपत्तीं चे विशलेशन करुन कृती कर्यक्रम बनविने या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

या कार्यशाळेस उपआयुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी,नगर अभियंता संदिप कारंजे,सह संचालक, नगर रचना विभाग केशव जोशी, लक्ष्मण चलवादी,आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, पर्यावरण व्यवस्थापक स्वप्नील सोलनकर ,अनिल विपात (एनएचएआय),जी. एस. चोपडे (वन विभाग), एस. एस. हरहरे (आयएमडी),मेघर्णी विरपे (एमआयडीसी), ज्योती पवार (एमआयडीसी), डॉ. एल. आर. तांबडे (केव्हीके, सोलापूर), जाधव एस. बी. (प्राचार्य, कृषी महाविद्यालय), डब्ल्यूआरआय इंडियाचे प्रतिनिधी महेश हरहरे, मेहुल पटेल, लिओना न्युन्स, आदित्य खरे,जान्हवी माने, अमोल गोमासे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट

Next Post

वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post
वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group