सोलापूर – भारत सरकारच्या सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणेस मनाई, सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ उत्पादनाचे जाहिरावर प्रतिबंध, 18 वर्षावरील मुलांना तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध, शैक्षणिक संस्थेच्या 100 मिटर त्रिजेच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विकण्यास प्रतिबंध, तंबाखुजन्य पदार्थाच्या पॅकेच्या वेस्टनावर 85 टक्के भागात चित्रमय रेखाटनासह वैधानिक इशारा असणे वगैरे कलमा नुसार अंमलबजावणी करणे बाबत सूचीत केले आहे.
भारत सरकारच्या आदेशा प्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेच्या हद्दीत कार्यरत असलेल्या सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपआपले पोलीस ठाणेच्या हद्दीत वरील कायदयाच्या कलमा प्रमाणे जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी आदेशीत केले होते.
त्या प्रमाणे सोलापूर ग्रामीण जिल्हयात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) ची अंमल बजावणी करून आॅक्टोबर 2019 अखेर एकूण 5847 केसेस् करून 1 कोटी 16 लाख 9 हजार 400 इतके रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.
सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन ) कायदा 2003 (COTPA ACT) अन्वये केलेल्या कारवाई मध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक आल्याने संबंध हेल्थ फौंडेशन यांचेकडुन मा.पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांना प्रशंसापत्र मिळाले आहे.
सदर कारवाई बाबत मा.पेालीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांनी जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.