सोलापूर : सुन्द्री सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, केंद्रीय संगीत नाटक अकादमी युसी न्यू जर्सी अमेरिका, मल्हार डिजीटल, गितांजली पेन्ट, हॉटेल ऐश्वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ जुलै २०२२ रोजी सुन्द्री सम्राट संगीत महोत्सव आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार दि. २३ जुलै २०२२ रोजी सायं- ५.३० वाजता किर्लोस्कर सभागृह पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे संचालक बिभिषण चवरे, महिला व बाल विकास विभागीय उपायुक्त – संजय माने यांच्या हस्ते सुन्द्री सम्राट संगीत महोत्सवाचे उद्घाटन होईल यावेळी महोत्सवाची सुरूवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव, मास्टर सिद्राम जाधव, नरेंद्र बंजत्री, शकुंतला जाधव, आश्वीनी माने, कलाश्री जाधव यांच सामूहिक सुन्द्री वादन यांना नितीन दिवाकर हे सहकलावंत म्हणून तबल्याची साथ करतील.
तसेच यावेळी आंतराष्ट्रीय किर्तीचे अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन यांना सहकलावंत म्हणून पंडित डॉ. रविकिरण नाकोड हे तबला साथ करतील. मध्यप्रदेश, भोपाळ येथील अफजल हुसेन यांचे धुप्रद गायन सादर करतील. त्यांना लातूरचे गोपाळ जाधव यांचे सहकलावंत म्हणून पखावज साथ करतील. पंडित अतुलकुमार उपाध्ये व पंडित भिमण्णा जाधव यांचे वायोलिन व सुन्द्री वाद्याचे जुगलबंदी कार्यक्रम होईल. त्यांना पंडित डॉ. रविकिरण नाकोड हे तबला साथ लाभणार आहे.
रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी – ९.०० वाजता. बेंगलोरचे पंडित रुद्रेश बंजत्री व मुंबईचे सदाशिव कोरवी यांचे सामुहिक जुगलबंदी सनईवादन पंडित मनमोहन कुंभार तबला साथ करतील. बनारसच्या शास्त्रीय गायिका तेजस्वीनी वेर्णेकर यांचे शास्त्रीय गायन त्यांना पंडित मनमोहन कुंभार तबला साथ तर राजकुमार सावळगी हे संवादिनी साथ करतील. आंतराष्ट्रीय किर्तीचे पंडित मिलिंद तुळणकर यांचे जलतरंग वादन होईल. त्यांना गणेश तानवडे हे तबला साथ करतील. श्रीनिवास काटवे, अंबिका काटवे, भरतनाट्यम नृत्य शिष्य समूहित पारंपारिक नृत्य सादर करतील. दिपक कलढोणे या संपूर्ण संगीत महोत्सवाचे सुत्र संचालन करतील. हे दोन्ही दिवसाचे कार्यक्रम हिराचंद नेमचंद वाचनालय, किर्लोस्कर सभागृहामध्ये होत असून, ते सर्वांसाठी खुले आणि मोफतमध्ये आहे. तरी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन पंडित भिमण्णा जाधव यांनी केले आहेत.