सोलापूर : एम.आय.डी.सी येथे दिनांक ९ जुलै, २०२२ रोजी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल शाळेतील बाळ गोपाळांनी आषाढी एकादशीचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आली होती यावेळी. विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले.याचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाईच्या पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विविध संतांची भूमिका साकारून संतांची शिकवण आणि आदर्शमय जीवनाचे महत्व सांगितले. या दिंडीमध्ये पालकांचाही सहभाग होता.

या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी शशिभूषण यलगुलवार, मुख्याध्यापिका सीमा यलगुलवार. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल ताटे आदींनी आषाढी एकादशीच्या शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोळी व यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू मिरेकर .सपताळे . राठोड , शहापुरे, . हिंगमिरे , मानसी निलंगेकर, बनसोडे आदींनी अथक परिश्रम घेतले.