येस न्युज नेटवर्क : अंमलबजावणी संचालनालयाने चिनी मोबाईल कंपनी Vivo विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. या संदर्भात 5 जुलै रोजी ईडीने विवो आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात देशभरातील विविध राज्यांमध्ये 44 ठिकाणी छापे टाकले होते. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत.
ईडीने अलीकडेच विवोविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. चिनी मोबाईल कंपन्यांवर रॉयल्टी आणि करचुकवेगिरीच्या नावाखाली देशाबाहेर पैसे पाठवल्याचा आरोप आहे. दरम्यान, चीनने बुधवारी आशा व्यक्त केली की, भारत कायदा आणि नियमांनुसार Vivo विरुद्ध चौकशी करेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.