मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार दोन टप्प्यांमध्ये हा विस्तार होणार आहे. या विस्तारात भाजपला 27 ते 28 मंत्री पद मिळतील तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला तेरा ते चौदा मंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता महाराष्ट्राला नवे कारभारी कधी मिळतात याची उत्सुकता लागली आहे.
त्यानुसार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्याचा शपथविधी होईल तर दुसरा टप्पा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपच्या कोट्यातील काही प्रमुख चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे त्याआधी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यात दोन्ही बाजूच्या 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. भाजपकडे 27 ते 28 मंत्रिपदे असणार आहेत.